ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय   

प्रायोगिक तत्त्वावर उपक्रमाची सुरूवात 

पिंपरी : ओला-उबेरला रिक्षा चालकांनी आता आमचा ऑटोचा,पर्याय निर्माण केला आहे. प्रायोगिक तत्वावर याची सुरूवात केली आहे. भविष्यकाळात पाच हजार रिक्षा चालक आणि एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकर्‍यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.पिंपरी येथे गुढीपाडव्यानिमित्त नुकतीच रिक्षा चालकांची बैठक पार पडली. या वेळी  कांबळे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना योग्य, तत्पर सुविधा मिळावी म्हणून आमचा ऑटो. ही सुविधा निर्माण करण्यात आल्याचे या  कांबळे म्हणाले.
 
या वेळी. मेट्रोचे अधिकारी डॅनियल  , महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाळासाहेब ढवळे लक्ष्मण शेलार, शुभम तांदळे, टेक्नॉलॉजी पटणार सूरज प्रताप सिंग, गैवर कुमार सिंग,आदी उपस्थित होते.कांबळे म्हणाले की, केंद्र सरकार सहकारी तत्त्वावर ओला-उबेरसारखा प्लॅटफॉर्म तयार करू पाहत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या घोषणेचे स्वागत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहोत. सहकारी तत्वावर मोबाईल प निर्मिती करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून यामध्ये  सहभागी होण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड, पुणे येथील रिक्षा चालकांनी घेतला आहे. रिक्षा चालक-मालकांनी एकत्र येऊन, ओला, उबेरच्या धरतीवर  स्वतःचा मोबाईल प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा आज केली याचा आनंद आहे. लवकरच या मोबाईल प्लिकेशनचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पुर्वी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील, पाच हजार रिक्षा चालक व एक लाख प्रवासी यांना या योजनेमध्ये जोडले जाणार आहे. यानंतर या पचे अधिकृत उद्घाटन केले जाईल, असे  कांबळे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे रवींद्र लंके, विनायक ढोबळे, अविनाश जोगदंड, सिद्धेश्वर सोनवणे, विशाल ससाणे, खालील मकानदार, पप्पू वाल्मिकी, अविनाश साळवे, पप्पू गवारे,दत्ता गिल्ले, बालाजी गायकवाड, साहेबराव काजळे, बबन काळे , मुकेश सावंत, ज्ञानेश्वर भोसले , गोविंदा आंधळे, गोरख कांबळे, संतोष पडघाम , सोमनाथ जगताप, संतोष तामचीकर , दिपक उबाळे यांनी परिश्रम घेतले. 
 
स्वतःचे अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील रिक्षा चालक - मालक यांनी पुढाकार घेतला आहे. आमचा ऑटो हे अ‍ॅप्लिकेशन प्रायोगिक तत्वावर बनविले आहे. त्यामधील तांत्रिक अडथळे दूर करून लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी ते अंमलात आणले जाईल.
 
बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.

Related Articles